Saturday, May 10, 2014

मुंबई मराठी पत्रकार संघाचा वेब जर्नलिसम अभ्यासक्रम

ईपेपर आवृत्ती, वेबसाईट, जास्तीत जास्त प्रात्यक्षिकावर भर, न्युज रुमला भेट, सायबर क्राईम अभ्यास, तज्ञांचे मार्गदर्शन या जाहिरातीमुळे मुंबई मराठी पत्रकार संघाचा वेब जर्नलिसम अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. प्रमोद चुंचुवार, सुनिल घुमे यांसारख्या नावाजलेल्या व या क्षेत्राचा जास्त अनुभव असलेल्या पत्रकारांशी अभ्यासक्रमादरम्यान जास्त संपर्क होणार होता, याचा सुरुवातीपासुनच सर्वांनाच आनंद झाला. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज पत्रकारांशी थेट संवाद साधता येण या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य जाणवले. पत्रकारिता प्रमाणपत्र कोर्सही यासोबत अभ्यासायला मिळाला हे विशेष. वेबसाईट, ब्लॉग याबद्दल नव्याने माहिती मिळाली. उपस्थिती कमी या कारणामुळे काही लेक्चर राहुन गेले. 

प्रेस विझीट, मंत्रालय व्हीझीट अशा गोष्टीं न झाल्यामुळे जरी कोणाचे नुकसान झाले नसले तरी तो अभ्यासक्रमाचा भाग होता हे मान्य करावे लागेल. न्युज चॅनल ला मुलाखतीसाठी गेल्यास वेब जर्नलिसम सोबत प्रमाणपत्रासाठी प्रमाणपत्र कोर्सही करायला हवा होता अस जाणवले. 6 ते 8 या दोन तासाच्या वेळेत सुरवातीचा अर्धा-पाउण तास सुरुवात होण्यास गेला. वेळ वाढविण्याची गरज असल्याचे भासले. अशा प्रकारचा दुसर्या ठिकाणी कोर्स एकिवात नाही  पण 10200 ही अभ्यासक्रमाची रक्कम जरा जास्तच वाटली. विद्यार्थ्यांनी नेहमी हजर राहणे हे अनिवार्य होतच पण कामाच्या वेळेनुसार सर्वांनाच ते शक्य झाल नाही. चांगला ग्रुप, बरे वाईट अनुभव या अभ्यासक्रमामुळे अनुभवायला मिळाले. 

No comments:

Post a Comment