pravind12345
Saturday, May 10, 2014
थोडक्यात माहिती
इंटरनेट ब्राउजर्स-कोणत्याही गोष्टीची माहीती
इंटरनेटद्वारे हवी असल्यास आपण गुगल क्रोम,मोझीला फायरफोक्स अशा ब्राउजर्सचा उपयोग
करतो याला इंटरनेट ब्राउजर्स म्हणतात. या सर्च ईंजीनमध्ये जाउन आपण कोणत्याही
प्रकारची माहीती मिळवु शकतो. यामध्ये सर्च बॉक्स जाउन कोणत्याही प्रकारचे अक्षर
टाकल्यास त्याविषयीची माहीती उपलब्ध केली जाते. यामध्ये मॅप, ईमेज, व्हीडिओ,
बातम्या अशा सुविधा यावर उपलब्ध होउ शकतात.
अँड्रॉईड सिस्टिम
इंटरनेटच्या वाढत्या प्रभावामुळे
बहुसंख्य इंटरनेट युजर्स हे ईपेपरलाच जास्त पसंती देतात. ऑफिसमध्ये, घरबसल्या एका
क्लीकवर ईपेपर पाहता येतो. मागील कोणतेही अंक पाहण्याची सुविधाही यामुळे उपलब्ध
होते.
लोकसभा निवडणुक 2014
लोकसभा निवडणुकीच्या तोफा नुकत्याच थंडावल्या आहेत.16 मे दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी अनुभुती घेवुन येणार आहे. आघाडी सरकाला त्यांची सत्ता टिकवण्यासाठी धडपड करतेय तर युती सरकार आपली सत्ता आणण्याच्या प्रयत्नात आहे. निवडणुकीपुर्व प्रचारात भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची रणधुमाळी मिडीयात चर्चेचा विषय बनली. अब की बार मोदी सरकारचा नारा देशभर दुमदुमला. त्याची चांगलीच धसकी आघाडी सरकारने घेतल्याचे दिसुन आले. सोशल मिडियाचा प्रभावी वापर करुन मतदारांपर्यंत पोहोचण्यात भाजपाला यश आले.
वाढत चाललेला भ्रष्टाचार, सरकारचे उघडकीस आलेल घोटाळे यांमुळे जनसामान्यांत कॉंग्रेससरकारविरुध्द वातावरण तयार झाले. आपच्या अरविंद केजरीवाल यांनी कॉंग्रेस आणि भाजपाला पर्याय म्हणुन आपणच आहोत असे चित्र तयार करत दिल्लीची सत्ता काबिज तर केली पण पन्नास दिवसही त्यांना टिकवता आली नाही म्हणुन मतदार पुन्हा संभ्रमात पडले गेले. देशभरात झालेल्या 543 ठिकाणच्या मतदानात महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान झाले. यंदाची लोकसभा निवडणुक ही कॉंग्रेसविरोधी लाटेखाली रंगली असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. ज्यामध्ये नरेंद्र मोदी नावाचा खुप गवगवा झाला. निवडणुकीचे धुसर चित्र थोड्या दिवसात स्पष्ट होईल. यामधुन जर एन.डी.ए चे सरकार येउन नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर हा लोकशाहीचा विजय समजायचा की सोशल मिडीयाचा वाढता प्रभाव यावर नक्की विचार करता येईल. पण निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांचे उणेदुणे काढण्यात आले, वैयक्तीक टिका टिपण्णी करण्यात आली. येणारा काळच ठरवेल सत्ता कोणाची असेल पण एकंदरीत वातावरणावरुन युती सरकारच्या बाजुने जनमताचा कल असल्याचा प्राथमिक अंदाज बांधता येईल.
व्याख्याते व आवडता लेक्चर
माहीतीचा अधिकार- अनिल
गलगली
मराठी शुध्दलेखन- दिपक
रंगारी
इलेक्ट्रॉनिक मिडीया- श्रीरंग
गायकवाड
ईपेपर आवृत्ती- निलेश बने,
अमेय गोगटे, हरिश शेख,जयकृष्ष नायर,प्रशांत जाधव
वेबसाईट- सचिन पिळणकर
माहिती व जनसंपर्क-संतोष
टाकले, प्रशांत डिंगणकर
स्वतहाचे अनुभव- मिनल माळी,
चैताली गुरव, शशिकांत सांडभोर
क्रिडा-महेश विचारे
फिचर्स- राजेश शिरभाते
अंधश्रध्दा- पुरुषोत्तम
महिला हक्क-जयश्री बोरकऱ
डॉक्युमेंट्री-सुशिल सहारे
वेबसाईट-प्रमोद गणेशा
जनरल बीट-मनोज गडणीस
विधानसभा- प्रमोद चुंचुवार
महापालीका रचना- पांडुरंग
म्हस्के.
फोटोशॉप- सिध्देश सावंत
मराठी बेसिक-सरस्वती
कुवळेकर
शुध्दोधन आहिर
आनंद आवधानी
प्रमोद गायकवाड
सर्वच व्याख्याते सर्वोत्तम
होते. पण त्यातला एकच जर निवडायचा झाला तर माहितीचा अधिकार या विषयावर झालेले
लेक्चर प्रभावी झाले. वेळेत सुरु झालेले लेक्चर दोन तासात जास्तीत जास्त माहिती
विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. माहितीचा अधिकार 2004 च्या अंतर्गत सरकारी दफ्तरमधील
माहिती आपण सहज मिळवु शकतो व तो आपला हक्क आहे याची जाणीव या लेक्चर दरम्यान झाली.
स्वतहाला सो कोल्ड व्हाईट कॉलर सरकारी बाबु समजुन रमत गमत काम करणार्या कामचोरांवर
यामुळे कारवाई होणे शक्य झाले. आदर्श घोटाळा उघडकीमुळे माहिती अधिकाराची व्याप्ती
दुनियेला समजली. वैयक्तीक घरगुती कामासाठीही म्हाडा कार्यालयातील माहीती
मिळविण्यास मला मदत झाली.
मुंबई मराठी पत्रकार संघाचा वेब जर्नलिसम अभ्यासक्रम
ईपेपर आवृत्ती, वेबसाईट, जास्तीत जास्त प्रात्यक्षिकावर भर, न्युज रुमला भेट, सायबर क्राईम अभ्यास, तज्ञांचे मार्गदर्शन या जाहिरातीमुळे मुंबई मराठी पत्रकार संघाचा वेब जर्नलिसम अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. प्रमोद चुंचुवार, सुनिल घुमे यांसारख्या नावाजलेल्या व या क्षेत्राचा जास्त अनुभव असलेल्या पत्रकारांशी अभ्यासक्रमादरम्यान जास्त संपर्क होणार होता, याचा सुरुवातीपासुनच सर्वांनाच आनंद झाला. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज पत्रकारांशी थेट संवाद साधता येण या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य जाणवले. पत्रकारिता प्रमाणपत्र कोर्सही यासोबत अभ्यासायला मिळाला हे विशेष. वेबसाईट, ब्लॉग याबद्दल नव्याने माहिती मिळाली. उपस्थिती कमी या कारणामुळे काही लेक्चर राहुन गेले.
प्रेस विझीट, मंत्रालय व्हीझीट अशा गोष्टीं न झाल्यामुळे जरी कोणाचे नुकसान झाले नसले तरी तो अभ्यासक्रमाचा भाग होता हे मान्य करावे लागेल. न्युज चॅनल ला मुलाखतीसाठी गेल्यास वेब जर्नलिसम सोबत प्रमाणपत्रासाठी प्रमाणपत्र कोर्सही करायला हवा होता अस जाणवले. 6 ते 8 या दोन तासाच्या वेळेत सुरवातीचा अर्धा-पाउण तास सुरुवात होण्यास गेला. वेळ वाढविण्याची गरज असल्याचे भासले. अशा प्रकारचा दुसर्या ठिकाणी कोर्स एकिवात नाही पण 10200 ही अभ्यासक्रमाची रक्कम जरा जास्तच वाटली. विद्यार्थ्यांनी नेहमी हजर राहणे हे अनिवार्य होतच पण कामाच्या वेळेनुसार सर्वांनाच ते शक्य झाल नाही. चांगला ग्रुप, बरे वाईट अनुभव या अभ्यासक्रमामुळे अनुभवायला मिळाले.
नरेंद्र मोदींना अटक करण्याची कॉंग्रेसमध्ये धमक नाही- ममता बॅनर्जी
बेहरामपुर- नरेंद्र मोदींना अटक करण्याची कॉंग्रेसमध्ये धमक नाही, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी कॉंग्रेसवर तोफ डागली. शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कॉंग्रेसवर टिका करत आम्ही मोदींना जेलमध्ये पाठवु असेही त्या म्हणाल्या. कॉंग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये खेळ चालु आहे ज्यामध्ये जनतेच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे. मोदीच पंतप्रधान असल्याचे चित्र तयार केलेजात आहे. मुल जन्माला येण्याआधीच लग्नाचा विचार करणे या पध्दतीचे वातावरण तयार केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढे बोलताना म्हणाल्या कि, कॉंग्रेस पक्षाने भाजपावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे, जे त्यांच्याकडुन होत नाही.मोदींचे सरकार आले तर खालच्या जातीतील बांधवांना जगणे मुश्किल होणार आहे. कॉंग्रेस भ्रष्टाचाराला बढावा देत आहे. बिजेपी ची वाढ होण्यास कॉंग्रेस आणि सी.पी.एम हे वैयक्तीक जबाबदार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Subscribe to:
Posts (Atom)