लोकसभा निवडणुक 2014
लोकसभा निवडणुकीच्या तोफा
नुकत्याच थंडावल्या आहेत.16 मे दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी
अनुभुती घेवुन येणार आहे. आघाडी सरकाला त्यांची सत्ता टिकवण्यासाठी धडपड करतेय तर
युती सरकार आपली सत्ता आणण्याच्या प्रयत्नात आहे. निवडणुकीपुर्व प्रचारात भाजपाचे
पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची रणधुमाळी मिडीयात चर्चेचा
विषय बनली. अब की बार मोदी सरकारचा नारा देशभर दुमदुमला. त्याची चांगलीच धसकी
आघाडी सरकारने घेतल्याचे दिसुन आले. सोशल मिडियाचा प्रभावी वापर करुन मतदारांपर्यंत
पोहोचण्यात भाजपाला यश आले.
वाढत चाललेला भ्रष्टाचार, सरकारचे
उघडकीस आलेल घोटाळे यांमुळे जनसामान्यांत कॉंग्रेससरकारविरुध्द वातावरण तयार झाले.
आपच्या अरविंद केजरीवाल यांनी कॉंग्रेस आणि भाजपाला पर्याय म्हणुन आपणच आहोत असे
चित्र तयार करत दिल्लीची सत्ता काबिज तर केली पण पन्नास दिवसही त्यांना टिकवता आली
नाही म्हणुन मतदार पुन्हा संभ्रमात पडले गेले. देशभरात झालेल्या 543 ठिकाणच्या
मतदानात महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान झाले. यंदाची लोकसभा निवडणुक ही
कॉंग्रेसविरोधी लाटेखाली रंगली असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. ज्यामध्ये
नरेंद्र मोदी नावाचा खुप गवगवा झाला. निवडणुकीचे धुसर चित्र थोड्या दिवसात स्पष्ट
होईल. यामधुन जर एन.डी.ए चे सरकार येउन नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर हा
लोकशाहीचा विजय समजायचा की सोशल मिडीयाचा वाढता प्रभाव यावर नक्की विचार करता
येईल. पण निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांचे उणेदुणे काढण्यात आले, वैयक्तीक टिका
टिपण्णी करण्यात आली. येणारा काळच ठरवेल सत्ता कोणाची असेल पण एकंदरीत
वातावरणावरुन युती सरकारच्या बाजुने जनमताचा कल असल्याचा प्राथमिक अंदाज बांधता
येईल.
No comments:
Post a Comment